प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ८९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पुणे :प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ८९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या.

१९३४ साली आदरणीय गुरुवर्य कै .शंकरराव कानिटकर यांनी लावलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रोपट्याचा ८९ व्या वर्षी आज मोठा वटवृक्ष झाला आहे.   दिवंगत गुरूवर्य श्री.  शंकररावजी कानिटकर आणि त्यांच्या 5 शिक्षक सहकाऱ्यांनी १९३४ मध्ये “अक्षय तृतीया” या शुभ मुहूर्तावर या संस्थेची स्थापना केली . प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीतील  प्रमुख शब्द “प्रोग्रेसिव्ह” आणि “मॉडर्न” हे आता ब्रीदवाक्य बनले आहेत.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावर काम करत असुन आज प्रोग्रेससिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या  अंतर्गत ६२  विविध युनिट्स ज्ञानदानाचे काम करत आहेत. एकुण ६५००० विद्यार्थ्यांना संस्था ज्ञानदानाचे काम करते. विविध क्षेत्रांमध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आपले नाव मोठं करत आहे . कला , क्रीडा , शिक्षण, संशोधन, राजकारण   सर्वच क्षेत्रामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी प्रगती करत असुन निरनिराळ्या देशात सर्व स्तरावर ते योगदान देत आहेत.   
“व्यापारीकरणाचा अजिबात शिरकाव न झाल्याने गुणवत्ता आणि शासकीय नियम यांचे काटेकोर पालन करत ज्ञानदानाचा यज्ञ अखंड ही संस्था चालवत आहे. गेले ८९ वर्ष ही संस्था अव्याहतपणे ज्ञानदानाचे काम करत आहे. 


शिक्षकांनी पाया भरलेल्या या संस्थेची धुरा शिक्षकांनीच समर्थपणे संभाळल्याने या कार्याचे पावित्र्य संस्थेने राखलेले आहे. जुन्या नव्याचा संगम या संस्थेत पहायला मिळतो. नवीन शैक्षणिक धोरणातील बदल व नवीन वाटा संस्थेने आत्मसात केलेल्या आहेत.नवनवीन अभ्यासक्रम आणि अद्ययावत शिक्षण देण्यास संस्था सदैव बांधील राहील. यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद पाठीशी असल्याने पुढील अनेक वर्ष उत्कृष्ट शिक्षण देण्यास ही संस्था कटिबध्द आहे असे संस्थेचे कार्यवाह  मा.प्रा. डाॅ. गजानन एकबोटे यांनी सांगितले. 


” प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या चार महाविद्यालयांचे नॅक,बंगलोर यांचेकडून मुल्यांकन झाले आहे. मॉडर्न,कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,(स्वायत्त) शिवाजीनगर पुणे ५ या महाविद्यालयाला नॅक कडून A +( प्लस) श्रेणी प्राप्त झाली आहे आणि सीजीपीए ३. ५१ इतकाआहे. या महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यायाला (स्वायत्त) A+(प्लस)सीजीपीए 3.41 श्रेणी प्राप्त आहे.मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे ५ यांना नॅक कडून A++( प्लस प्लस) श्रेणी असून सीजीपीए ३.६६ इतका आहे. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एन बी ए कडून मूल्यांकन झाले आहे.शासनाकडे मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. मॉडर्न लॉ महाविद्यालयाला नॅक कडून A श्रेणी असून सीजीपीए ३. ०५ इतकी आहे.

See also  चांदणी चौक रंगाला सजला पण बसथांबा उन्हातला?


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत संस्था संचालित सर्व महाविद्यालयांमध्ये विविध चर्चासत्रे ,कार्यशाळा यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु झालेली आहे.असे संस्थेचे सचिव प्रा.शामकांत देशमुख यांनी सांगितले.
या वर्धानदिनानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र, विधी विभाग व संस्थेचे माजी विद्यार्थी अशा अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.गजानन एकबोटे यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी डाॅ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ,
डाॅ. भुषण पटवर्धन,माजी उपाध्यक्ष, युजीसी(University Grant Commission) पोलिस इन्स्पेक्टर माने
राजकीय क्षेत्र मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मा. बागेश्री मंठाळकर, श्री. प्रदीप देशमुख, श्री. गौरव बापट,श्री. विजय तडवळकर, श्री बाळासाहेब बोडके, मा. रवी शिंगणापुर,प्रा. परमानंद कुलपती, डाॅ गंगाधर शिरुडे उपकुलपती बालाजी विद्यापीठ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डाॅ. संजय सोनावणे,(प्र कुलगुरू),डाॅ. पराग कालकर, डाॅ. धनंजय लोखंडे, डाॅ. दिपक माने,डाॅ.महेश आभाळे,डाॅ.विजय खरे,डाॅ. सानप, डाॅ. अशोक थोरात, डाॅ सुधाकर जाधवर, डाॅ.उत्तम चव्हाण, डाॅ.धनंजय लोखंडे, डाॅ. चाबुकस्वार,डाॅ. विजय डोईफोडे, डाॅ प्रशांत साठे, डाॅ अशोक कांबळे,प्रा अ.ब.गोसावी, डाॅ अविनाश कुंभार, संस्थाचालक भाऊसाहेब जाधव, सुनील रेडेकर, डोईफोडे सर, भिजले सर, श्री.गोसावी सर,मासाळकर सर,वैद्यकीय क्षेत्रातील डाॅ. पराग संचेती, राजेश पांडे,सामाजिक क्षेत्रातील बाबा आढाव ,अँडव्होकेट एस. के.जैन उपस्थित होते.
या वर्धापनदिनासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित सर्व शाळा,महाविद्यालयांचे प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सर्व नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. डाॅ. जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर , उपकार्यवाह प्रा.डाॅ. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख उपस्थित होते.