जैन विचार मंचच्या वतीने ‘आहार दिन’ निमित्त ‘ऊसाचे रसपान’

कोथरूड : जैन समाजाने जैन विचार मंचच्या वतीने ” अक्षय तृतीया ” भगवान ऋषभनाथ यांचा आहार दिन या निमित्ताने ” ऊसाचे रसपान ” हा कार्यक्रम कोथरुड , गुजरात काँलनी पुणे येथे आयोजित केला होता.

याच दिवशी जैन परंपरेतील पहिले तीर्थकर भ. ऋषभनाथ यांनी आपला उपवास ” इक्षुु ” (ऊसाचा रस ) प्राशन करुन सोडला . तो दिवस म्हणजेच “अक्षय तृतीया सदर कार्यक्रम ” मातंग सांस्कृतिक क्रांतीचे जनक ” जेष्ठ साहित्यिक , जैन धर्माचे अभ्यासक , विचारवंत , जैन विचार मंच चे निमंत्रक आदरणीय विठ्ठल साठे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रमाची सुरुवात णमोकार मंत्र म्हणुन करण्यात आली .
यावेळी त्यांनी अक्षय तृतीया , भगवान ऋषभनाथ यांचा उपवास आणि मातंगवंश प्रथा याबद्दल सविस्तर माहिती दिली . त्या नंतर मा.साठे साहेबांच्या हस्ते श्री.आनंद वाघमारे यांस प्रमाण पत्र देवुन जैन धर्मात स्थितीकरण करण्यात आले . व नंतर उपस्थित बंधु-भगिनींना ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले .
यावेळी जैन विचार मंचाचे सचिव , शंकर वाघमारे तसेच मंचाचे क्रियाशिल सदस्य राजेंद्र भोंडवे , पांडुरंग दुबळे , सनि भोंडवे , सोमनाथ कानडे , प्रतिक कांबळे , संतोष भोडवे , ऋषिकेश वाघमारे , प्रसाद मोरे , गणेश खुडे , शंकर लोखंडे , गोटु वाघमारे , गुरुनाथ महापुरे , केतन वाघमारे , विजय भोंडवे , भानु भोंडवे तसेच…जेष्ठ सदस्य बापु सकटे , शिवाजी वाघमारे , संपत दुबळे आदी उपस्थित होते .

See also  लोकसभा निवडनुकीचा संग्राम हा देश एकसंघ मानणारे विरुध्द देशाचे उत्तर दक्षिण असा भेद करणार्‍यांमध्ये - माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर