औंध : अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने रागदारी सोसायटी, सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्सवाचा आनंद लुटला.
कार्यक्रमास मा. श्री. कैलासदादा गायकवाड, माजी नगरसेवक, पुणे मनपा, माजी अध्यक्ष विधी समिती तथा ज्येष्ठ वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मा. सौ. आदितीताई गायकवाड कडू-पाटील, सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस, मा. श्री. संकेत कडू-पाटील, उद्योजक यांच्यासह तानाजी अमृतसागर, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर हांडे, विजय मोरे, अमित चौगुले, प्रवीण चव्हाण, सचिन चौगुले, संभाजी कांबळे, श्रीकांत गायकवाड तसेच अजिंक्य मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने औंधमधील शिवताल ढोलपथकाने दमदार ढोलवादन सादर करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. ढोल-ताशांच्या गजरात परिसरातील वातावरण जल्लोषमय झाले.
यावेळी चरीई नागरिक मित्र मंडळ, चेंबूर यांच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला मंडळाच्या वतीने रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला.
















