केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

पुणे : केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेस भेट देऊन शाळेचा परिसर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब, निवास व्यवस्था, भोजनगृह, खेळाचे मैदान तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी सुविधांची माहिती घेतली. शाळेतील सुविधांविषयी समाधान व्यक्त करून शाळेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

श्री. वावा हे आयोगाच्या कामकाजासाठी पुणे दौऱ्यावर आले असून प्रारंभी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह पुणे येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र हा ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले.

बार्टी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, ‘घर घर संविधान’ उपक्रम आदींची माहिती दिली. बार्टी द्वारा संचलित येरवडा येथील निवासी शाळेत सफाई कामगारांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री.वारे यांनी दिली .

बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या हस्ते आयोगाच्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री चेंडके, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, शाळेतील शिक्षक व कर्मचारी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

See also  पुणे रिंग रोड व विरार – अलिबाग मार्गिकेसाठी भूसंपादनासह निविदा प्रक्रिया राबविण्यास विशेष प्रकल्प म्हणून परवानगी – मंत्री दादाजी भुसे