वसुंधरा अभियान रक्तदान शिबिरामध्ये 166 जणांचे रक्तदान

बाणेर : वसुंधरा अभियान बाणेरच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये१६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी , माजी नगरसेविका स्वप्नाली  सायकर, माझी नगरसेवक अमोल बालवडकर , माजी नगरसेविका ज्योती कळमकर,नितीन कळमकर मानिक गांधीले ,गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,शिवम सुतार ,राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, लहू बालवडकर‌,सचिन दळवी आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे रघुनाथ ढोले, ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी दीड लाख रोपांचे मोफत वाटप केले जाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.

बाणेर बालेवाडी पाषाण औंध परिसरातील नागरिकांनी यावेळी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.

See also  महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन