सनी वर्ल्डमध्ये लग्न मुहूर्ताच्या वेळीच लावले तर चक्क ’२५,५५५’ रुपये बक्षीस

पुणे: सध्या लग्नसराईत बहुतेक ठिकाणी लग्न वेळेत लागत नाहीत हा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो. मुहूर्ताची वेळ लक्षात ठेऊन नातेवाईक व मित्रपरिवार लग्नाला येत असतात. मात्र आपण वेळ चुकवली की सगळ्यांची गैरसोय होते. अनेकदा महत्वाचे पाहुणे वेळेत आले नाहीत म्हणूनही मुहूर्त लांबतो. याचा विचार करून लग्नाची वेळ पाळण्याचे ठरवले पाहिजे.

पुण्याच्या सुस रोड येथील सनीज वर्ल्ड मध्ये लग्न मुहूर्ताच्या वेळेत लागावी म्हणून एक प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे. मुहूर्त वेळेत लग्न लावल्यास रोख २५,५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मुहूर्ताचे पावित्र्य आणि उपस्थितांच्या वेळेचा सन्मान म्हणून ही योजना आहे. उद्देश हाच आहे लग्न वेळेत लागावे आणि मुहूर्ताचे पावित्र्य राखत पाहुण्यांची गैरसोय टाळली जावी असे सनी निम्हण यांनी सांगितले.

See also  राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आयआयटीएममध्ये खुला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते