पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.राम ताकवले यांच्या नातेवाईकांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट

औंध : ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले सरांचे नुकतेच निधन झाले. ताकवले सरांचा अमीट ठसा आपल्या शिक्षण पद्धतीवर आहे. त्यांच्यामुळेच पुणे व एकूणच महाराष्ट्राची शिक्षण परंपरा आपला दर्जा टिकवून आहे.
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) संस्थापक संचालक म्हणून कार्यभार सांभाळत उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले. ग्रामीण भागातील ३० लाख विद्यार्थ्यांना त्यामुळे संगणक साक्षरता साध्य झाली. त्यांच्या औंध येथील निवासस्थानी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी महापौर दत्ता धनकवडे व माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व ताकवले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

See also  नृसिंह हायस्कूल सांगवी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन