कृषीमंत्री कोकाटे  मंत्रीपदावरून हाकलून द्या – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यात आंदोलन

पुणे:- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयात केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन लालमहल चौक येथे करण्यात आले. महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे आणि नेहमी सत्ताधारी हे शेतकऱ्यांची चेष्टा लावल्यासारखे वक्तव्य करीत असतात शेतकरी सक्षमीकरणासाठी हे सरकार काम करीत नाही हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते हे सरकार सामान्य माणसाचे नसून हे व्यापाऱ्यांचे आहे असा रोष शिवसैनिकांनी व्यक्त करून निषेध नोंदवला.


महिला शिवसैनिकांनी कोकाटे ला जोडे मारले, कृषिमंत्री हा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा दुवा असतो पण कोकाटे हा कृषिमंत्री म्हणून कलंक आहे. विजय मल्ल्या, निरव मोदी,   ललित मोदी देशातील बदकाची रूट करून परदेशात स्थायिक झाले. त्याच्याबद्दल कधी यांनी ब्र काढला नाही. ठाकरे सरकारच्या काळात शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. तुमच्यासारखे तुटपुंजी कर्जमाफी दिली नव्हती आणि तीपण 56 रू, 100 रू, 200 रू, 500 रू अशी आपली नुकसान भरपाई आणि अर्धवट कर्जमाफी देता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. असे यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले.

यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख आबा निकम, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, किशोर रजपूत, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेनेचे शहर संघटक राम थरकुडे, जिल्हा अधिकारी युवती सेना निकिता मारटकर, विभाग प्रमुख सूरज लोखंडे, मुकुंद चव्हाण, अजय परदेशी, संतोष भुतकर, रूपेश पवार, अमर मारटकर, जितेंद्र निजामपूरकर, अतुल दिघे, शिव आरोग्य सेना रमेश क्षिरसागर, दिलीप पोमण, आशिष अढळ, तुषार भोकरे, गणेश घोलप, बाळासाहेब गरुड, मिलिंद पत्की, नागेश खडके, दत्तात्रय करपे, बकुळ डाखवे, तानाजी पवळे, अनिल परदेशी, इम्रान खान, राहुल शेडगे, नितीन दलभंजन, दिलीप गालिंदे, वाहतूक सेनेचे सूरज खंडागळे, राजेश माने, सचिन घोलप,  महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, अमृत पठारे, वैशाली दारवटकर, सोनाली जुनवणे, नाज इनामदार, सविता गोसावी, युवासेने चे युवराज पारिख, परेश खांडके, सोहम जाधव, वैभव कदम, चिंतामणी मुंगी, तेजस मर्चंट, अक्षय हबीब, इंद्रजीत शिंदे, आणि शिवसैनिक उपस्थित होते.

See also  डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस