जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित सुरेल “दिवाळी पहाट”, बाणेर परिसरात प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या संगीताचा अनोखा उत्सव

बाणेर :  दिवाळीच्या मंगलमय वातावरणात बाणेर परिसरातील नागरिकांसाठी कालची सकाळ अविस्मरणीय ठरली.
माऊली ग्राऊंड, माऊली पेट्रोल पंप शेजारी येथे “दिवाळी पहाट” या सुरेल कार्यक्रमाने संगीतप्रेमींच्या मनात नवचैतन्य जागवले.
हा उपक्रम जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन, स्त्री फाउंडेशन आणि रागा म्युझिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या मधुर स्वरांनी पहाटेचे वातावरण सुरांनी भारले. त्यांच्या गायनाने उपस्थित रसिकांना संगीताच्या एका अद्भुत अनुभूतीत नेऊन ठेवले. या सुरेल कार्यक्रमाला बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीताच्या स्वरांनी सजलेल्या या पहाटेने सर्वांच्या मनात दिवाळीच्या आनंदात एक नवा, सुरेल रंग भरला.

सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबतच समाजात एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे अशा स्वरूपाचे उपक्रम सतत होत राहावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीही दहीहंडी उत्सव, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.या परिसरातील नागरिकांचा सर्व उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

याप्रसंगी बाणेर बालेवाडीचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, जयेश मुरकुटे, संतसेवक मारुती कोकाटे, माजी नगरसेविका रंजनाताई मुरकुटे, अशोकराव मुरकुटे, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, शंकरराव घोलप, राजाभाऊ सुतार, अमर लोंढे, सारंग वाबळे, खडके गुरुजी, चंद्रकांत जाधव, सुधाकर भाऊ धनकुडे, परिसरातील वारकरी संप्रदाय, वसुंधरा अभियानचे सदस्य, नवचैतन्य हास्यक्लबचे सदस्य, स्री फाउंडेशनचेप्राची सिद्दिकी आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्य, तसेच रागा संगीत ॲकॅडमीचे पूजा आरोटे आणि सहकारी सदस्य, त्याचप्रमाणे संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाई प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकाची भूमिका खासगी सावकारा सारखी - राजीव गांधी स्मारक समितीचा आरोप