औंध भागात पोलीस असल्याचे बतावणी करून दुकानातील कामगाराला मारहाण

औंध : औंध भागातील सिद्धार्थ कलेक्शन मालक भरत शेठ भाटिया यांच्या दुकानात दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करत दादागिरी करत कामगाराला मारहाण केली. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांना औंध व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी मागणी केली.


यावेळी औंध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवी ओसवाल, भरत शेठ बाठीया, केसुजी परीहार, ढकलाराम चौधरी, बेलाराम चौधरी, नितीन बाटिया, आशिष राठोड, विनोद बोरा शशिकांत रानवडे, दिनेश डाबी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !