अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

हडपसर : अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने हडपसर येथील वैदवाडी पोलीस स्टेशन जवळ पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच विशेष सरकारी वकील नियुक्त करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामधे भिमजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी अक्षय भालेराव याची गावातील गावगुंडांनी जातीय द्वेशातून निर्घृण हत्या केली.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या घटनेबद्दल आक्रोश व्यक्त होत असतांनाच वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुनवर कुरेशी, कार्याध्यक्ष प्रफुल गुजर, शहर उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, अनिता चव्हाण, विशाल कसबे , परेश शिरसंगे , जीवन गाडे, सतीश रणवरे, हडपसर विधानसभा पदाधिकारीयांच्या नेतृत्वात पुणे सोलापूर रस्ता रोको आंदोलन येथे करण्यात आले.

यावेळी सुनील धेडे ,स्वप्निल वाघमारे ,धर्मराज लांडगे, अभिजीत बनसोडे,सतीश रणवरे,जिवन तात्या भडके,ओंकार कांबळे,हरी वाघमारे, कोमल ताई शेलार,सारिका फडतरे, रेखाताई चौरे आदी उपस्थित होते.
यावेळी महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

See also  पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त