पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड सीबीआयच्या जाळ्यात; सरकारी निवासस्थान व बाणेर येथील घरावर सीबीआयचा छापा

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (IAS) सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायवेलगतच्या एका जमिनीशी संबंधित हा व्यवहार होता.

या कारवाईनंतर दुपारी सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी छाप्यानंतर काहीच वेळात पोलिसांनी पैसे मोजण्याचे दोन मशिन्स तर मागवले शिवाय पैसे मोजण्यासाठी काही बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले.

रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अरितिक्त विभागीय आयुक्त आहेत.

दरम्यान, सीबीआयचा तपास अद्याप सुरु असल्याने या कारवाईमध्ये काय आढळून आले याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई होण्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.

See also  ऐश्वर्या आंदळकर पाटील हिने  2 सुवर्ण पदके जिंकली.