औंध येथील सर्वे नंबर 158 मधील डीपी रस्त्यातील अतिक्रमणे काढण्याचा मार्ग मोकळा; रस्त्यासाठी पालिकेने तातडीने कारवाई करण्याची मागणी

औंध : औंध येथील सर्वे नंबर 158 मधील डीपी रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वे पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला असून औंध डीपी रस्ता मधील अतिक्रमणे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेले पंचवीस वर्षाहून अधिक औंध डीपी रस्ता रुंदीकरण रखडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाणेर व औंध हद्दीवरील मोजणी करून देखील औंध हद्दीतील 60 फूट रस्त्याचे काम अद्याप करण्यात आले नाही.

रस्त्याच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच अनधिकृत बांधकामांमुळे देखील रस्त्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे रस्ता पूर्ण होत नसल्याने या परिसरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. टोटल स्टेशन सर्वे नंतर रस्त्यामध्ये बाधित होत असलेल्या इमारतींची संख्या व अनाधिकृत बांधकामे याची माहिती पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे लवकरच यावर कारवाई करून रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रस्त्यामधील अनधिकृत बांधकामे व रस्त्यामध्ये परवानगी देण्यात आलेली बांधकामे हटवण्यासंदर्भात कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महानगरपालिकेच्या  विभागांची संयुक्त बैठक घेऊन कारवाईची दिशा ठरवण्यात येईल असे पुणे महानगरपालिकेचे बांधकाम अधिकारी यांनी सांगितले.

औंध बाणेर हद्दीवरील गेले अनेक दशके रखडलेला रस्त्याचा हा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून पालिका प्रशासनाने वेगाने प्रक्रिया पूर्ण करून कार्यवाही करावी अशी मागणी प्रवीण नवले यांनी केली आहे.

See also  'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर प्रतिकृती साकारणार ; सजावटीस  प्रारंभ