मुळशी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष सहकार्याने पुणे जिल्हा नियोजन समिती फंडातून मुळशी तालुक्यातील वाळेण गावातील श्री वाघजाई देवी मंदिर सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रूपये निधी मंजुर करण्यात आला.याचा भूमिपूजन समारंभ मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद ढमाले व शिवसेना जिल्हाप्रमुख मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपकआबा करंजावणे,भा.ज.पा.तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे,सहकार आघाडीचे अध्यक्ष सोपान निबुदे,उपतालुका प्रमुख विकास खैरे,मा.चेअरमन माऊली बलकवडे,मारूती कुरपे,वाळेण गावचे सरपंच संजय साठे,मा.सरपंच मंगलताई मेंगडे, ग्रामपंचायत सदस्य विजय साठे,ग्रामसेवक शेलार भाऊसाहेब,वसंत चोरघे,भिकु धिडे,नथु दुर्गे,दिपक वाघ,अर्जुन धिडे,ह.भ.प.दत्तोबा महाराज साठे,दशरथ गुरव,ज्ञानोबा साठे,व्हा.चेअरमन माऊली लायगुडे,तंटामुक्त अध्यक्ष बंडु लायगुडे,बळीराम साठे,चिंधु साठे,किसन मानकर, संतोष साठे,युवानेते अक्षय अमराळे वसंत खाणेकर,संतोष लायगुडे,दशरथ साठे,सचिन टेमघरे व ग्रामस्थ उपस्थित होते.