उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, आमदार विजय शिवतारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी श्री. पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध मान्यवर तसेच महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  गरजू विद्यार्थिनींना 'जिव्हाळ्या'चा पोषक आहार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार