एमपीएलमध्ये महिलांचे प्रदर्शनीय सामने २५ जुन पासून

पुणे : – महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रिमिॉयर लीग (एमपीएल) स्पर्धेत उद्या,(२५ जुन २०२३ रोजी)रविवारपासून महिलांच्या तीन प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांचे तीन प्रदर्शनीय सामने एमसीए महिला रेड, एमसीए महिला ब्लू आणि एमसीए महिला यलो अशा तीन संघांत होणार आहेत. सामने दु. १.३० वाजता होणार असून, ते सर्वांसाठी खुले असतील.

स्मृती मानधना (ब्लू), देविका वैद्य (रेड) आणि तेजल हसबनीस (यलो) यांच्याकडे संघांचे नेतृ्त्व सोपविण्यात आले आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना जी आयसीसी २०२१ची सर्वोत्तम महिला खेळाडू होती, ती या सामन्यांचे प्रमुख आकर्षण आहे. त्याचबरोबर देविका वैद्य, किरण नवगिरे, अनुजा पाटील यांचा देखील सहभाग असणार आहे.

या वर्षी एमपीएलच्या प्ले-ऑफ लढती दरम्यान महिलांच्या तीन प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन आम्ही करत आहोत. पुढील वर्षीपासून मात्र, चार संघांची महिला एमपीएल आयोजित करू, असे एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.

या प्रदर्शनीय सामन्यातून स्मृती, देविका, किरण आणि अनुजा या अनुभवी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी उदयोन्मुख मुलींना मिळणार आहे. महिलांचे तीन प्रदर्शनीय सामने 25, 27, 28 जुन रोजी दुपारी 1.30 वजाता एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गाहुंजे येथे होणार आहेत. 25 जुन रोजी एमसीए महिला निळा संघ व एमसीए लाल संघ यांच्यात पहिला सामना रंगणार असुन उर्वरित दोन लढती अनुक्रमे 27 व 28 जुन एमसीए निळा संघ विरुध्द एमसीए पिवळा संघ, तर एमसीए पिवळा संघ विरुध्द एमसीए लाल संघ यांच्यात रंगणार आहेत.

संघ – (कंसात खेळाडूंचा अनुभव)
एमसीए महिला ब्लू: स्मृती मानधना (भारत), माया सोनवणे (इंडिया कॅम्प), शिवाली शिंदे, श्रद्धा पोखरकर (दोन्ही चॅलेंजर मालिका), लक्ष्मी यादव, सायली लोणकर, ऋतुजा देशमुख, साक्षी वाघमोडे, प्रियांका गारखेडे, रसिका शिंदे, आणि श्वेता (सर्व महाराष्ट्र)
प्रशिक्षक : चंदराणी कांबळे; सहाय्यक : वैष्णवी काळे

See also  भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त, क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

एमसीए महिला रेड : देविका वैद्य, अनुजा पाटील, किरण नवगिरे (भारत), श्रावणी देसाई, भक्ती मिरजकर, आदिती गायकवाड, इशिता खळे, प्रियंका घोडके, गौतमी नाईक, श्वेता माने, उत्कर्षा पवार, ईशा पठारे आणि रोहिणी माने (सर्व महाराष्ट्र),
प्रशिक्षक : मंदार दळवी; सहाय्यक: सोनिया डबीर

एमसीए महिला यलो: तेजल हसबनीस, ईश्वरी सावकर (दोन्ही भारत ‘अ’), आरती केदार (इंडिया कॅम्प), अंबिका वाटाडे, पूनम खेमनार, मुक्ता मगरे, साक्षी पाटील, सुहानी कहांडळ, माधुरी आघाव, समृद्धी बनवणे आणि चिन्मयी बोरफळे (सर्व महाराष्ट्र),
प्रशिक्षक : भावना गवळी; सहाय्यक : सोनम तांदळे.