औंध क्षेत्रीय कार्यालयात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नागरिकांच्या समस्यांसाठी बैठक

औंध : औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नागरिकांच्या कामासंदर्भामध्ये शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या सोबत नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक बंडू ढोरे, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सचिन मानवतकर, सागर गुजर आदी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी औंध परिसरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, नागरस रस्ता परिसरात सोसायट्यांना जाणवत असलेली पाणी समस्या, कचरा व आरोग्य विषयक समस्या याबाबत क्षेत्रीय कार्यालयाचे होत असलेले दुर्लक्ष आदी समस्यांचा पाढा वाचला.

यावेळी औंध परिसरातील विविध सोसायट्यांचे नागरिक उपस्थित होते. औंध परिसरातील नागरिकांची कामे पुणे महानगरपालिकेच्या कडून होत नसल्यामुळे या कामांसंदर्भामध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये सातत्याने आढावा बैठका क्षेत्रीय कार्यालयात घेतल्या जात आहेत.

See also  ऑल इंडिया बीएसएनएल , टेलिकॉम एलआयसी, बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन