पौड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना केले पोषक आहाराचे वाटप ;138 क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक

मुळशी : पिरंगुट उद्योग नगरी मधील एसएफएस ग्रुप इंडिया प्रा.लि.कंपनी च्या वतीने ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत’ या अभियाना अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत पौड येथील शासकीय रुग्णालयामधील क्षयरोग रुग्णांना आवश्यक असणाऱ्या नियमित पोषक आहाराचे नुकतेच वाटप करण्यात आले.

या वाटपा बरोबरच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान व क्षयरोग दूरीकरण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत क्षयरोग रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी पौड शासकीय रुग्णालयासह इतर परिसरातील एकूण 138 क्षयरोगी रुग्णांना एसएफएस ग्रुप च्या वतीने दत्तक देखील घेण्यात आले.तेव्हा या सर्व रुग्णांचा पोषक आहाराचे सहकार्य हे एसएफएस ग्रुप च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती एसएफएस कंपनीचे मुख्य संचालक प्रशांत कोरे यांनी दिली.

याप्रसंगी एसएफएस कंपनीचे मुख्य संचालक प्रशांत कोरे यांच्या सह मनुष्यबळ विभागाचे मुख्य अधिकारी राहुल सावंत,एच.आर.अधिकारी रविकिरण लिमकर,अतुल जोशी, विवेक कोद्रे त्याचप्रमाणे कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश्वर सुपेकर तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे चे अनेक पदाधिकारी व कंपनीचे इतर सहकारी उपस्थित होते.

See also  मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस जाहीर