संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी कोथरूड काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

कोथरूड : महापुरुषांची बदनामी करणारे संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी कोथरूड काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

महाराष्ट्रातील युवकांची माथी भडकवणाऱ्या संभाजी भिडे या विकृत बुद्धीच्या इसमाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढले. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या समूहाच्या महापुरुषाबद्दल हा इसम नेहमी गरळ ओकत असतो. भाजपा सरकार याच्यावर कधीही कारवाई करायला धजावलं नाही. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी सहन करणारं नाही. संभाजी भिडे याच्यावर गुन्हा दखल करून त्याला अटक करण्याची मागणी कोथरूड परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, दत्ता जाधव उमेश ठाकुर, युवराज मदगे, महेश विचारे, किशोर मारणे, विशाल भलके,रामदास केदारी,शारदा वीर व इतर उपस्थित होते.

See also  शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश