पिंपरी : योगीराज पतसंस्था शाखा कृष्णानगरची 7 वी मासिक सभा शाखा कृष्णानगर येथे संस्थेच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. या समयी कृष्णानगरच्या शाखा उपाध्यक्षपदी श्री अनिल खैरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी त्यांचा सन्मान करताना संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, व जय शिवराय ज्येष्ठ नागरिक संघ,शाहूनगर चे अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर, संचालिका सौ अलकाताई सिरसगे, शाखा संचालक दत्तात्रय भापकर, रामदास जाधव, प्रदीप नेवाळे,पांडुरंग कदम, ज्येष्ठ नागरिक दिनकर पंडित व व संस्थेचा स्टाफ उपस्थित होता.























