24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप

पुणे : पुणे शहरामध्ये 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप ठरत आहे.
24×7, पुणे मेट्रो यासह विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी होत आहेत.

विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे. काल आपण त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा दिला आहे. कर्वेनगर व एरंडवणा,अलंकार पोलीस स्टेशन जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, के52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणकेला मार बसला आहे.


24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत. यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.मनपा च्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे. खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको अशी मागणी नागरिक करत आहेत. तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

See also  विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस