पुण्यामध्ये कष्टकरी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण व भव्य तिरंगा रॅली द्वारे सामाजिक संदेश देत आम आदमी पार्टीच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा

पुणे : विद्येचे माहेरघर व आयटी नगरी पुणे शहरांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने कष्टकरी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करत ७६वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तसेच सुमारे दोन किलोमीटर लांब तिरंगा रॅली पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये काढण्यात आली. या रॅलीमध्ये तीन हजाराहून अधिक आम आदमी पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

डेक्कन जिमखाना येथे ध्वजवंदन करण्यात आली. तसेच आप्पी आमची कलेक्टर या चित्र मालिकेमधील काम करणाऱ्या अभिनेत्री पुष्पा चौधरी, पुणे महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष सफाईदूत म्हणून कार्यरत असलेल्या माया लोंढे, घरगुती व्यवसायातून हॉटेलचा व्यवसाय उभा केलेल्या लता इंगळे या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला व त्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच देशाचे स्वातंत्र्य चिरायू राहावे हा संदेश देण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. डेक्कन जिमखाना येथून रॅली निघून सारसबाग सणस मैदानाजवळ सांगता करण्यात आली.

रॅलीमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशात प्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या. स्वातंत्र्य आणि लोकशाही संवर्धन जनजागृती व संविधान याबाबत जागृती करणारे संदेश यावेळी देण्यात आले.

यावेळी आम आदमी पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुणे शहरातील शिक्षण आरोग्य न्याय कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवर नागरिक ध्वजारोहणा मध्ये सहभागी झाले होते.

See also  कोथरूड येथे कै. शिरीष तुपे यांच्या स्मरणार्थ 31 व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन