अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बाणेर : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व विद्यांचल हायस्कूल येथे 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल नितीन शर्मा तसेच पॅराप्लेजिक सेंटर खडकी येथील वलसलन नादर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, झेंड्याचा प्रवास या विषयावर भाषण व शहीद जवानांना वंदन करणारे मूकनाटय सादर केले.लेफ्टनंट कर्नल नितीन शर्मा यांनी आपल्या मनोगतात आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य असून त्यांनी सतत देशप्रेमाची भावना मनात जागृत ठेवली पाहीजे असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका सौ रंजनाताई मुरकुटे, संचालक श्री भालचंद्र मुरकुटे, योगिता बहिरट, रेखा जाधव तसेच शाळेतील मुख्याध्यापिका संगीता डेरे, दिपाली पाटील, मनिषा कुलकर्णी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रभा लोंढे यांनी केले. वंदे मातरम आणि खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  येरवडा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन