जिल्हाधिकारी कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेतील अनियमितता निषेध आंदोलन

पुणे: राजीव गांधी पंचायत राज संघटन व कोथरूड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे येथे संजय गांधी निराधार योजनेत जी गेल्या 1 वर्षापासून अनियमितता आली आहे त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम ह्यांना निवेदन द्याण्यात आले. त्यांनी आमच्या निवेदनावर विचार करून योग्य ते निर्देश द्याण्याचे आश्वासन दिले.


ह्या आंदोलनामध्ये राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे,शिवाजी सोनार, कान्हाभाऊ साळुंखे, चैतन्य पुरंदरे, युवराज मदगे, भगवान कडू, दिनकर कोतकर, तुकाराम भोसले, रोहन जाधव, विश्वास खवळे, नयना सोनार, मनीषा गायकवाड, गीता चोरघे, रेशमा उभे, मंगल तोंडे, मनीषा कांबळे, संगीता कंधारे, ज्योती बनसोड, कमाल घुले इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ह्या आंदोलनाचे संयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे व कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे ह्यांनी केले होते.

See also  ऑल इंडिया बीएसएनएल , टेलिकॉम एलआयसी, बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन