कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरोधात व्यक्तव्य करणाऱ्या विश्वजीत देशपांडे ला अटक करा… मंजिरी धाडगे (समता परिषेद महिला अध्यक्षा महाराष्ट्र राज्य)

पुणे : परशुराम संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे याने छगन भुजबळ यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर त्याच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.पुण्यात समता परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर विश्वजित देशपांडे च्या पोस्टरला जोडे मारत त्याच्या विरोधात तीव्र घोषणा बाजी करत हल्ला बोल आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलतां समता परिषेच्या राज्याच्या अध्यक्षा मंजिरीताई धाडगे म्हणाल्या समाजातील वातावरण दूषित करण्यासाठी अश्या प्रकारची व्यक्तव्ये करत आहे. तरुणांना मारहाणी साठी प्रोत्साहित करून १लाखाचे बक्षीस जाहीर करणाऱ्या विश्वजीत देशपांडे ला तातडीने अटक करून त्यावर गुन्हा नोंदवावा.

समता परिषद पदाधिकारी सपना माळी म्हणाल्या की, विश्वजीत देशपांडे हा मानसिक व विकृत रुग्ण असून त्यावर तातडीने उपचार करण्याची मागणी केली तसेच त्याला अधून मधून वेड्याचे झटके येतात त्यावर ही त्याच्या वर शासकीय मनोरुग्णालयात उपचार करावेत .

पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी म्हणाले की ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला ठोकून त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे देशपांडेला तातडीने अटक करून त्यांच्या वर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली . यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे,अविनाश चौरे, प्रीतेश गवळी , पंढरीनाथ बनकर , वैष्णवी सातव , शिवराम जांभूळकर, सागर दरवडे,गौरी पिंगळे, संगीता माळी,प्रदीप हूमे,प्रदीप बनसोडे,महेश बनकर,सुधीर होले,नागेश भुजबळ, महेंद्र बनकर , विशाल बोरावके, हनुमंत टिळेकर, प्रतीक राऊत , उमेश म्हेत्रे ,मुकेश वाडकर उपस्थित होते.

See also  होर्डिंगची उंची व रुंदी याचे ऑडिट करण्यासाठी शासनास निर्देश द्यावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा लक्षवेधी चर्चेत सहभाग ; महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन