कोथरूड : महाराष्ट्र भूगोल समिती ने तयार केलेले वैविध्यपूर्ण नकाशे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून आपला महाराष्ट्र समजून घ्यावा असे आवाहन ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
विविध शाळांना हे नकाशे भेट देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूगोल तज्ज्ञ डॉ. सुरेश गरसोळे,ह्या उपक्रमाच्या प्रमुख प्रकल्पक मा. नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष सौ.मंजुश्री खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, चिटणीस कुलदीप सावळेकर,कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश खत्री,ऍड. मिताली सावळेकर,मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे,प्रभाग 13 चे अध्यक्ष राजेंद्र येडे,श्रीकांत गावडे, अपर्णाताई लोणारे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव पी. व्ही.शास्त्री, सहसचिव प्रदीप वाझे, शिशु विहार शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल इंगूळकर,35 शाळांचे मुख्याध्यापक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचा क्लास ही घेतला. “अभ्यारण्य” म्हणजे काय असे विचारलं असता एका विद्यार्थिनीने “जंगल” असे उत्तर दिले, यावर दादांनी ” अभ्यारण्य म्हणजे जेथे विविध प्राण्यांसाठी संरक्षित असे जंगल” हे स्पष्ट करतानाच “म्हणूनच ह्या पर्यटनाच्या आणि आपला महाराष्ट्र समजून घेण्याच्या ज्ञानाच्या दृष्टीने महानकाश्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कर्वे संस्थेची ही शिशु विहार शाळा आदर्श शाळा व्हावी यासाठी जे जे शक्य आहे ती सर्वतोपरी मदत करण्याचे ही मा. चंद्रकांतदादांनी घोषित केले.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक आणि सहकाऱ्यांनी राज्यातील एखादी आदर्श शाळा बघावी व तेथे जे आहे त्यातील जे तुमच्या शाळेत नाही ते मी देईन असे जाहीर केले.
ह्या उपक्रमाच्या प्रकल्पक मंजुश्री खर्डेकर यांनी ह्या नकाश्याची गरज विषद करताना ” विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठाना विविध ठिकाणं दाखविण्याचा आग्रह धरावा, यातूनच आपल्याला आपल्या राज्यातील गड, किल्ले, प्राचीन मंदिर, अभ्यारण्य व अन्य प्रेक्षणीय ठिकाणं माहिती होतात व त्यातून आपली समृद्ध संस्कृती समजते असे सांगितले “. तसेच असे विविध वैशिष्ट्य असलेले नकाशे तयार असून पुढील काळात सर्व शाळांना मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने ते भेट दिले जातील असे स्पष्ट केले.
डॉ. सुरेश गरसोळे यांनी हे नकाशे तयार करण्यामागची भूमिका स्पष्ट केली व भूगोल म्हणजे फक्त भौगोलिक रेषा नाहीत तर त्यात विविध स्थळांचा नामनिर्देश म्हणजे नकाशा असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांकडून “आम्ही पर्यावरण रक्षण करू अशी हमी घेतली”.
माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी विदयार्थ्यांकडून गाणी म्हणवून घेतली.
मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन व प्रास्ताविक केले, कोथरूड मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापिका शीतल इंगूळकर यांनी आभार प्रदर्शन केले.