प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या दोन महाविद्यालयांना स्वायतत्ता

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माॅडर्न काॅलेज आँफ ईंजिनिअरींग व माॅडर्न ईन्सिस्टुट आँफ बिझनेस मॅनेजमेंट( एम आय बी एम) ला स्वायतत्ता मिळाली आहे. या विषयी पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन एकबोटे म्हणाले,” स्वयत्तेमुळे रोजगारभिमुख आभ्यासक्रम राबविता येतील व आंतरशाखिय शिक्षण देणे शक्य होईल. आमच्या इतरही संस्था स्वायत्तेकडे जात आहेत. संस्था क्लस्टर विद्यापीठाकडे वाटचाल करत आहे.”


या परिषदेमधे संस्थेच्या सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, संस्थेचे सचिव प्रा शामकांत देशमुख, उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे यांच्यासह प्राचार्य डाॅ कल्याणी जोशी, डाॅ राजेंद्र झुंजारराव, डाॅ संजय खरात, संचालिका डाॅ विजयालक्ष्मी श्रीनिवास उपस्थित होते.
डाॅ एकबोटे म्हणाले नविन शैक्षणिक धोरणामुळे कौशल्यधित आभ्यासक्रम तयार करुन राबविणे सोपे झाले आहे. क्लस्टर विद्यापीठाचे नियम शिथिल होण्यासाठी डाॅ रस्तोगी यांच्याकडे मी सगळ्यात जा्स्त शिफारसी केल्या आहेत. त्या मान्य झाल्यास आम्ही क्लस्टर विद्यापीठासाठी प्रयत्न करु. आमची चार महाविद्यालये स्वायत्तता मिळण्याच्या वाटेवर आहेत.
सगळ्यात जास्त मुभा आम्हाला एम आय बी एम मधे मिळेल. त्याचा जास्तीत जास्त वापर करुन आम्ही विद्यार्थी रोजगारभिमुख करु व जास्तीत जास्त उद्योजकता कशी निर्माण होईल या कडे आमचे लक्ष राहिल असे डाॅ निवेदिता एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

See also  बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूरू