बाणेर मुळा नदी किनारी छठ पुजा उत्साहात साजरी

बाणेर : बाणेर, बालेवाडी, सुस, महाळूंगे परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी   बाणेर नागरी पतसंस्था संस्थापक / सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या तर्फे तसेच शिवसेना बाणेर,बालेवाडी ,सुस ,महाळुंगे यांच्या वतीने आपल्या परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांच्यासाठी बाणेर येथील मुळा नदी घाटावर छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी मावळत्या सूर्याला अर्घ्य वाहून सोमवारी उगवत्या सूर्याला नमन करून हजारोंच्या उपस्थितीत छटपूजेचा सोहळा रंगला होता. यावेळी उत्तर भारतीय नागरिकांनी धार्मिक परंपरेनुसार पूजा केली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वर्मा हे निमंत्रक होते.

या कार्यक्रमाची माहिती देताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी सांगितले की, बाणेर, बालेवाडी, सुस, महाळूंगे परिसरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक वास्तव्यास असून त्यांचा छठ पुजा हा फार मोठा उत्सव साजरा करता यावा म्हणून खास छठ पुजा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पुढे देखील उत्तर प्रदेश मधील हिंदू सण समारंभ उत्साहात साजरे करण्यासाठी प्रयत्न करत राहू.

यावेळी राम गायकवाड, जयसिंग मुकुंदा मुरकूटे , पुनम विधाते, संतोष भोसले, प्रकाश वर्मा, धर्मनाथ वर्मा, काशिनाथ वर्मा, दिनेश वर्मा, रणजित वर्मा, जय शहा, मंजु वर्मा, किरण वर्मा, विद्यासागर, विनोद वर्मा, जितेंद्र प्रजापती, फैज आलम, महिंद्र खटनाल तसेच परिसरातील उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  शिवाजीनगर गावठाणात मंदिरांची स्वच्छता, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सहभाग