भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विनम्र अभिवादन

पुणे :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ नेते  उल्हासदादा पवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मा. अतुलजी लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा घेण्यात आली.

यावेळी अभिवादन करताना *मा. उल्हासदादा पवार* म्हणाले की, ‘‘भारतीय संविधान व लोकशाही जगवायची असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रबोधन केले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार प्राप्त करून दिला आहे तो आज सत्ताधाऱ्यांना लोकांना पैसे देऊन विकत घ्यावा लागतोय ही मोठी खंत असल्याचे उल्हासदादांनी सांगितले.’’


यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ‘‘देशात जर लोकशाही व लोकशाहीची मूल्ये टिकवायची असतील तर एक व्‍यापक लढा सुरू करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचे मा. अतुल लोंढे यांनी सांगितले. काँग्रेसने ७० वर्षात जी देशहिताची कामे केली, ज्या योजना आणल्या त्या संपुष्टात आणण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला असून त्याकरीता ई.व्‍ही.एम. च्या माध्यमातून सत्ता हस्तगत करून आपल्याला सत्तेच्या माध्यमातून सर्व यंत्रणेंचा गैरवापर करून आपल्याला हवे तसे कायदे अमंलात आणण्याचा प्रयत्न मोदी शासन करीत आहे. त्यामुळे ई.व्‍ही.एम. हटवून बॅलेट पेपरद्वारे पुढील निवडणुका होण्याकरीता सरकारवर एक दबावतंत्र निर्माण करून नागरिकांचा एक मोठा व्‍यापक लढा उभारण्याची गरज या देशात असल्याचे लोंढे यांनी सांगितले.’’


यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व श्री. विठ्ठल गायकवाड यांनीही आपले अभिवादनपर आपले मोनागत व्‍यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, नितीन परतानी, शाम काळे, सुजित यादव, संदिप मोकाटे, रमेश सोनकांबळे, रवि आरडे, राजेंद्र मोहिते, अनिल जाधव, संतोष हंगर्गी, संदिप कांबळे, करण कांबळे, सचिन सावंत, भारत इंगुले, चंद्रकांत नार्वेकर, बळिराम डोळे, सुरेश नांगरे, अक्षय बहिरट, वैभव डांगमाळी, सुरेश चौधरी, ॲड. अश्विनी गवारे, पृथ्वीराज पाटील, देविदास लोणकर, सचिन भोसले, हर्षद हांडे, मनोहर गाडेकर, सुभाष काळे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  जबाबदार लोक इतके पोरकट बोलतात हे पहिल्यांदा पाहिले - शरद पवार