गॅस दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

पुणे : इराण इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धमुळे  देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या गॅस पुरवठ्याने केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत केलेल्या भरघोस वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, या दरवाढीच्या निषेधार्थ पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक येथे निषेध आंदोलन केले. रस्त्यावरच चुली पेटवून सरकारने गॅस चे दर वाढवण्याचा निषेध व्यक्त केला.

यासह हवेलीच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले. गॅस सिलिंडरच्या वाढवलेल्या किमती तात्काळ मागे घेण्यात याव्यात. सिलिंडर बुक करण्याचा कालावधी १५ दिवसांवरून एक महिना करण्यात आल्याने ग्राहकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, तो पुन्हा कमी करण्यात यावा.

सर्वसामान्य जनता, हॉटेल्स आणि छोटे व्यावसायिक यांना विना अडथळा गॅस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले , महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

यावेळी देविदास भंसाळी, कमलाकर सातव, आर जी यादव संजय अभंग, विशाल पवार, विश्वजीत जाधव , सुरेश मते, अवधूत मते, शंकर नलावडे, अर्चना शहा , श्रीकृष्ण बराटे , उज्वला पासलकर  आंदोले अजय खुडे साहेबराव मते संजय रायकर प्रभाकर भोरकडेयांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  गुलटेकडी औद्योगिक वसाहत व इंधना नगर परिसरातील विविध समस्यांबाबत लेखी निवेदन