शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली, या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत, सरसकट कर्जमाफी, पीक विमा, कापसाला हमीभाव मिळाला पाहिजे यांसारख्या अनेक मागण्यांसाठी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार नाना पटोले, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस आमदार वर्षाताई गायकवाड, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, उबाठा आमदार सुनील प्रभू, यांसह इतर आमदार उपस्थित होते.

See also  पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘शिवगर्जना’ महानाट्य; महिनाअखेरीस ‘महासंस्कृती महोत्सव’