बाणेर येथे सकल मराठा समिती कार्यालयाचे ७ एप्रिलला मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

बाणेर : सकल मराठा समाज मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे बाणेर येथे कार्यालय सुरू करण्यात येणार असून या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी, ७ एप्रिल,२०२४ रोजी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या सुविधा मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मराठा सहाय्यक समिती कार्यालयामधून मदत करण्यात येणार आहे असून औंध, बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वर वाडी, महाळुंगे, सुस, बोपोडी, छत्रपती शिवाजीनगर पुणे आदी परिसरातील मराठा बांधवांना याचा उपयोग होणार आहे.

सकल मराठा समाजातील युवक व सुशिक्षित बेरोजगार युवकांना या कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांचे अर्ज भरणे साठी सहाय्य करण्यात येणार असून ज्या मराठा बांधवांना कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना अर्ज भरण्या साठी देखील कार्यालयामार्फत सहाय्य करण्यात येणार आहे.

See also  लोहिया नगर परिसरात स्वच्छता व जलस्त्रोतांची निगा याबाबत जनजागृती रॅली