सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक कोथरूड येथे संपन्न

कोथरूड : सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक कोथरुड पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला संपुर्ण महाराष्ट्र राज्यामधुन २८ जिल्ह्या मधील मातंग समाजाच्या ४० संघटना, संस्था , पक्ष याचे प्रमुख- अध्यक्षांसहीत ३५० प्रतिनिधि उपस्थित होते.


मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड. नुसार वर्गीकरण करुन स्वतंत्र आरक्षण मिळावे ,मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करावी, लो. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा या मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या मागण्यांसाठी जिल्हा – शहर निहाय समन्वय समित्यांची स्थापना करण्यात येणार असुन समाजाची विभागवार आंदोलने करण्याचे नियोजन होणार आहे. बैठकीत २ महत्वपूर्ण ठराव पास झाले.


या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे माजी अध्यक्ष विजयबापु डाकले होते.
माजी मंत्री रमेश बागवे, आमदार सुनील कांबळे, महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्रा .मच्छिंद्र सकटे व मा. मारुती वाडेकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे ,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे,माजी नगरसेवक अविनाश बागवे , मा. शंकरभाऊ तडाखे, बहुजन महासंघाचे बाळासाहेब भांडे, माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ , राम चव्हाण ,पंडित सूर्यवंशी , लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे सदस्य राम कसबे, रामदास साळवे, अतुल जाधव , लक्ष्मण तांदळे, काशिनाथजी आल्हाट, महेशराव सकट लहुजी साम्राज्य सेनेचे विजय बगाडे आदि मान्यवर आदी प्रमुखांनी मार्गदर्शन केले. प्रस्तविक भास्कर नेटके यांनी केले .सूत्रसंचालन अनिल हतागळे तर आभार मातंग समाजाचे पुणे सचिव दयानंद अडागळे यांनी मानले .

See also  आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा पुढाकार