बीड : राष्ट्रवादी भवन, बीड येथे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून बीड जिल्हा हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच बालेकिल्ला राहील असा विश्वास दाखवून दिला आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करणे, शेतकरी, महिला, कामगार, सामान्य नागरिक, गोरगरीब, वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत राहू.बीड जिल्ह्यातील युवकांचा उत्साह, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा शरदचंद्र पवार साहेबांवर असलेला विश्वास जिल्ह्यातील माता – भगिनींनी उपस्थिती पाहून मला अधिक गतीने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.