पाषाणकर दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाषाण : दत्त जयंती निमित्त सुस रोड येथील पाषाणकर दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्री दत्त महाराजांचा अभिषेक, होम हवन, गुरुदत्त महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी श्री दत्त जन्माचे ह.भ. प. दत्तात्रय महाराज दहिभाते ह्यांचे प्रवचन,
श्री दत्त जन्म पाळणा आणि महाआरती जल्लोषात संपन्न झाली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. दर्शनासाठी सुमारे ४-५ हजार भाविकांनी उपस्थिती लावली. यावेळी रामजन्मभूमी येथील अक्षदाकलशाचे पुजन करण्यात आले होते.

ह्या दत्त जयंती कार्यक्रमाबरोबरच वर्षभर खालील उपक्रम देखील राबविले जातात. प्रत्येक गुरुवारी व एकादशीला भजन, प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद तसेच सर्व संतांच्या जयंती जल्लोषात साजरा करण्यात येतात.

See also  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन