मुळशी साठी पुर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाचे बोंबा मारो आंदोलन

पुणे : मुळशी तालुक्यात पुर्ण वेळ प्रशासकाची (गटविकास अधिकारी) नेमणूक करावी याकरिता स्वराज्य पक्षाचे जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार समोर बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.

गेल्या २ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न झाल्यामुळे नागरिकांची कामे करण्यासाठी गटविकास अधिकारी ह्यांची तालुका मुख्य प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून मुळशी तालुक्याला गटविकास अधिकारी न नेमल्यामुळे तालुक्यात पुर्ण वेळ प्रशासक नाही. नागरिकांची दैनंदिन कामे रखडत आहेत याविरोधात आज स्वराज्य पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा परिषद मुख्य इमारत येेथे बोंबा मारो आंदोलन केले.

मुळशी तालुक्याला गटविकास अधिकारी नियुक्त करावा यासाठी स्वराज्य च्या माध्यमातून राजू फाले यांनी वारंवार निवेदने व पाठपुरावा केला आहे. शासनाला पत्र लिहून, आंदोलनाचा इशारा देवूनही शासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे आज आंदोलन करण्यात आले. पुढील ७ दिवसांत जर गटविकास अधिकारी नेमला नाही तर अधिक आक्रमकपणे आंदोलन करेल असा इशारा यावेळी दिला.

यावेळी स्वराज्य चे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले, प्रतिक साखरे, विजय जरे, प्रविण भोसले, दादाराव बोबडे, विक्रम कदम, द्वारकेश जाधव,अजित बाबळसुरे, रोहित शिंदे,अक्षय बुचडे, राजेंद्र शेळके, योगेश बामगुडे, अमित गोडाबे, रणजित हुलावळे, सौरभ रायरीकर, किशोर भंडारी, आकाश घोटकुले, ओमकार सणस, अभि गाडे, विशाल वाघमारे, गुलाब चव्हाण, प्रदिप टेकाळे,सुरज टेमघरे, बिपिन दिवेचा, वैभव खाकरे, भारत साठे, कुणाल वाघमारे, किशोर भंडारी, भारत बोडके, प्रकाश साळवे, अभय बारगुजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक आणि कालबद्धरितीने व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश