बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी सुस बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. या दरम्यान त्यांच्या अडचणी जाणून घेत आगामी कार्य योजनांवर चर्चा केली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक सुविधा, वाहतूक कोंडी यासह अनेक प्रश्न मुरकुटे यांच्यासमोर मांडले. नागरिकांनी दैनंदिन जीवनातील अडचणींविषयी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयेश मुरकुटे यांनी नागरिकांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रभागातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन त्यांची गती वाढविण्यासाठी आवश्यक ती कार्ययोजना आखण्याबाबत चर्चा केली.
जयेश मुरकुटे म्हणाले की, “नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधणे ही खरी लोकशाही आहे. समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे.”
या संवाद उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
























