भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर नवनिर्वाचीत विश्वस्त व पदाधिकारी कार्यकारणी निवड बेकायदेशीर -डॉ. दिलीप मुरकुटे

बाणेर : नुकतीच बाणेर येथे झालेली भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ची विश्वस्त व पदाधिकारी निवड बेकायदेशीर रित्या करण्यात आले आहे. विश्वस्त व कार्यकारणी निवड करण्याआधी दोन महिने आधी निवड कार्यक्रम जाहीर करावा लागतो परंतु नवीन निवडीमध्ये कोणत्याही प्रकारे हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही त्यामुळे ही निवड प्रक्रियाच बेकायदेशीर असल्यामुळे पुन्हा पहिल्यापासून ही निवड प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

सदर पदाधिकारी व विश्वस्त निवड ही देवस्थान ट्रस्टच्या घटनेप्रमाणे करण्यात आलेली नाही.देवस्थान ट्रस्टच्या घटनेप्रमाणे प्रथम पोट नियम तयार करून अर्ज शुल्क भरून अर्ज घेणे व इतर बाबींचे पूर्तता करून घेण्यात आलेली नाही. सदस्य निवडीमध्ये सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात येते परंतु या नविन सदस्य व पदाधिकारी निवडी मध्ये कोणत्याही प्रकारे सर्वसाधारण सभा न घेता निवड करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे.

न्यायाधीश हे देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या नवीन निवडीमध्ये न्यायाधीशांची परवानगी घेणे अनिवार्य आहे परंतु त्या प्रकारे कोणत्याही प्रकारे न्याय दिशांची परवानगी न घेता निवड करण्यात आलेली आहे त्यामुळे ही निवड बेकायदेशीर आहे.

निवडणूक घेण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या सचिव व उपाध्यक्ष ची निवड करताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीशांची परवानगी घेणे अनिवार्य असते परंतु या नवीन निवडीमध्ये कोणत्याही प्रकारे न्यायाधीशांची परवानगी घेण्यात आली नाही.
पदाधिकारी निवड करताना गुप्त मतदान पद्धतीने मतदान करणे देवस्थानसट्रस्टच्या घटनेप्रमाणेअनिवार्य आहे. परंतु या नवीन निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सर्व सभासदांना पंधरा दिवस आधी देणे गरजेचे असते व त्यांच्या उपसूचना घेणे गरजेचे असते. परंतु या नवीन प्रक्रियेमध्ये असे कोणत्याही प्रकारे सभासदांना नोटीस देण्यात आल्या नाहीत व बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे सभासदांना कोणत्याही प्रकारे उपप्रश्न मांडता आले नाहीत.देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक बाबींसाठी तर गोष्टीचा बदल अर्ज करणे अनिवार्य असते परंतु नवे निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे बदल अर्ज देखील करण्यात आलेला नाही.


दिलीप मुरकुटे ( सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर ) म्हणाले,
बाणेर येथील भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार करून भव्य दिव्य असे मंदिर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे व त्याच पद्धतीने ट्रस्टचे जोरदार कामे चालू आहेत . 1986 साल पासून संघर्ष करून भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भक्कम पुणे उभे केले ट्रस्टच्या उभारणीसाठी सर्वस्व पणाला लावून आज भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट हे उभे केले आहे. त्याच भैरवनाथ देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या बेकायदेशीर रित्या निवडी करण्यात आले आहेत या निवडींना आमचा तीव्र विरोध आहे. जे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट सर्वस्व पणाला लावून आम्ही उभे केले आहे त्या ट्रस्टमध्ये चालू असलेला बेकायदेशीर कारभार आम्ही चालू देणार नाही. नवनिर्वाचित कार्यकारणी बेकायदेशीर रित्या निवड करण्यात आली आहे त्या बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .


शंकरराव सायकर म्हणाले, दिलीप मुरकुटे ज्ञानेश्वर तापकीर तसेच मी या भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट साठी सर्वस्व अर्पण केलेले आहे. यासाठी मला माझी नोकरी देखील गमवावी लागली आहे परंतु तरीदेखील आम्ही ट्रस्ट भक्कमपणे उभे केले. काल आलेल्या पोरांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हा निवडणुकीचा बेकायदेशीर स्टंट केलेला आहे या निवडी विरोधात आम्ही न्यायालयात देखील दाद मागणार आहोत.

ज्ञानेश्वर तापकीर ( उपाध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ) म्हणाले,
ज्या माणसांनी आपले सर्वस्व पणाला लावून देवस्थान ट्रस्ट साठी काम केले त्याच माणसांना आज बेकायदेशीररित्या बाजूला करण्यात येत आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट ची याआधीचे सर्व सदस्य व पदाधिकारी निवड ही बिनविरोध झालेली आहे त्याच पद्धतीने यंदा देखील ही निवड बिनविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती परंतु ज्या वेळेस ही निवड बिनविरोध होत नाही असे दिसून आले त्यावेळेस मी माझा राजीनामा दिला आहे. बाणेर येथील भैरवनाथ मंदिर हे भव्य दिव्य बनवावे अशी सदस्यांची स्वप्न होते त्याच पद्धतीने सदस्य काम करत होते. परंतु या नवीन निवड प्रक्रियेमुळे मंदिराचे काम मागे पडण्याची शक्यता आहे .

See also  बालेवाडी येथील 'खुल्या ऑफिस' मध्ये आम आदमी पार्टीमध्ये नागरिकांनी केला प्रवेश