युवा पिढीला आश्वासक अर्थसंकल्प

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अंतरिम अर्थसंकल्प -2024 सादर करतेवेळी युवा पिढीला आशावाद देण्याचे कार्य केले. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चतुसूत्रीच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रोजगार निर्मितीत गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. विविध योजनांप्रमाणेच आदिवासी भागाच्या विकासासाठी पंतप्रधान जनमन योजना पुढेही चालू ठेवली आहे. देशातील उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण 28 टक्के पर्यंत वाढले आहे. आय टी व आय आय टी क्षेत्रातील गुंतवणुकी बरोबरच एम एस एम इ मधील निधी वाढवल्यामुळे युवा पिढीला रोजगार संधी देणारा व जागतिक पातळीवर उदयन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा युवा पिढीसाठी आश्वासक अर्थसंकल्प मांडला आहे.
प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे
अर्थशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे

See also  मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गाठीभेटी