अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव ९५ स्वराज्य रथ यांचे स्वागत

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव ९५  स्वराज्य रथ यांचे स्वागत करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्त   दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्यातील स्वराज्य रथाचे स्वागत  करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी  अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने  ” पुढचं पाऊल” या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि स्वराज्य रथ सोहळ्यातील ९५  स्वराज्य रथाचे प्रमुखांना छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम आणि “पुढचं पाऊल ” ही पुस्तिका भेट देऊन स्वागत करण्यासाठी आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले,, महिला अध्यक्षा श्रुतिका पाडळे, सरचिटणीस गणेश मापारी, राकेश गायकवाड,सचिन वडघुले, अनिकेत भगत, सिध्दार्थ जाधव, संजय काळे,आतिश शेडगे,मीलन‌ पवार, कामिनी मेमाणे, इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

See also  कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन