स्वीप कार्यक्रमांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती

पुणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुणे महानगरपालिकेचे कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, सूसगाव, पाषाण आणि जयभवानी नगर येथे  मतदान जनजागृती करण्यात आली.

यावेळी सहाय्यक समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, समाजसेवक पांडुरंग महाडिक, समूह संघटिका उज्वला पाटील, पद्मा गुरव, समुपदेशीका गौरी कासार आदी उपस्थित होते.

कोथरूड सूसगाव व पाषाण येथील कार्यक्रमात घरातील मुली व युवकांचे नाव मतदान यादीत नसेल तर त्यांनी नाव नोंदणी करावी, मतदान नोंदणी करतांना क्युआर कोड कसा वापरावा व १०० टक्के मतदान‌ करण्याबाबत समुहसंघटिकानी मार्गदर्शन केले. त्यानंतर मतदान शपथ घेण्यात आली. 

जयभवानी नगर येथे बचत गटातील महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांची नोंदणी आणि मतदानाचे आवाहन करण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी महिला बचत मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. महिलांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे आपल्या परिचयातील महिलांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

See also  बालेवाडी येथील खड्ड्यांची स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसोबत अमोल बलवडकर यांच्याकडून पाहणी