लोकसभा निवडणुका संदर्भात पुणे शहर काँग्रेसची बैठक

पुणे : पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे लोकसभा मधील सर्व इच्छुक उमेदवारांची तसेच  लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित आली होती.

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह आमदार रवींद्र धंगेकर,मा आमदार मोहन जोशी,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,मा राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,मा आमदार दिप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस विरेंद्र किराड, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय बालगुडे,मा गटनेते आबा बागुल,मा महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी,मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक अविनाश बागवे, मा नगरसेवक रफिक शेख,मा नगरसेविका लताताई राजगुरू, मा नगरसेवक मुख्तार शेख,मा नगरसेवक दत्ता बहिरट, कामगार नेते सुनील शिंदे,मा नगरसेवक चंदुशेठ कदम,,मा नगरसेवक राजेंद्र शिरसाट,नरेंद्र व्यवहारे, ज्येष्ठ नागरिक संघाचे द स पोळेकर,संग्राम खोपडे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, इंटकचे अध्यक्ष बळीराम डोळे, युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, हेमंत राजभोज, अजित जाधव, संतोष पाटोळे,राजु ठोंबरे,शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, विठ्ठल गायकवाड, ऋषिकेश बालगुडे, मुकेश धिवार,सोशल मीडियाचे गुलामहुसेन खान, यशराज पारखी,रवि ननावरे, विक्रम खन्ना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जाहीर करण्यात आले असून अद्याप इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये तिकिटासाठी चूरस पाहायला मिळत असून मराठा उमेदवार म्हणून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तर चंद्रकांत पाटील यांना टक्कर देत हेमंत रासने यांचा पराभव करत पुण्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार असलेले रवींद्र धंगेकर तसेच ब्राह्मण उमेदवार म्हणून मोहन जोशी यांचा प्रामुख्याने पर्याय काँग्रेस पुढे असल्याचे वर्तवले जात आहे.

See also  राज ठाकरेंनी सांगितले आपल्या आवडत्या अभिनेत्रींचे नाव.