पुणे दि.२९:- लोकसभा निवडणूक कामासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्य़वेक्षक आणि समन्वयक अधिकारी यांचे प्रशिक्षण हडपसर येथील साधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी अधिकाऱ्यांना मतदार यादीचे अद्ययावतीकरण, हडपसर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणारी मतदान केंद्रे तसेच मतदार सहायता केंद्र , मतदाता ओळख चिठ्ठी वितरण, मतदार ओळख पत्र तसेच टपाली मतदान याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व समन्वयक अधिकारी आणि सहायक यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना आलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी नागनाथ भोसले व सर्व संबंधीत प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
*रिक्षा चालकांना मतदान जागृती करण्याचे आवाहन*
लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हडपसर येथे स्वीप व्यवस्थापन समितीच्यावतीने हडपसर परिसरातील श्री दत्त रिक्षा स्टॅन्ड येथे मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी रिक्षा चालकांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर रिक्षातील प्रवाशांनादेखील मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वीपचे समन्वयक अमरदीप मगदूम, मीडिया समन्वयक शैलेश शिंदे, सहायक संतोष गायकवाड यावेळी उपस्थित होते.