सुतारवाडी परिसरात आठवडाभर पाणीपुरवठा विस्कळीत नागरिक त्रस्त

सुतारवाडी : पाषाण सुतारवाडी येथील मोरया दर्शन परिसरामध्ये गेले आठवडाभर पुणे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत असून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा बंद असल्याने  संताप व्यक्त केला जात आहे.

पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्यांकडे महानगरपालिकेचे अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याने सदर अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. महानगरपालिकेच्या कामकाजामुळे बंद झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  भ्रष्टाचाराने वाकलेल्या स्मार्ट सिटी चे चित्र सध्या वाकलेल्या खांबान मधून बालेवाडी परिसरात पहायला मिळत आहे