मतदान वाढविण्याची घेतली शपथ

पुणे – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४व्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंदा मतदानाचे प्रमाण वाढविण्याची शपथ घेतली.

महापालिका भवनाच्या आवारात आयुक्त डॉ.भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, बी.पी.पृथ्वीराज आदी अधिकारी उपस्थित होते.

See also  इंडिया आघाडी होत असल्याने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी भाजपचे महा-षडयंत्र : आम आदमी पार्टी