औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उघड्यावरच जाळाला जातोय ठिकठिकाणी कचरा

बाणेर : बाणेर पाषाण सुसगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर टाकला जात असून हा कचरा जाळला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत परिसरामध्ये ठीक ठिकाणी कचरा जाळण्यात येत असून यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.

सुतारवाडी महामार्गाजवळ, बाणेर नॅन्सी हिल व्ह्यू जवळ, हुंडाई शोरूम सुसगाव आणि परिसरामध्ये कचरा जाळण्यात येत आहे. अनेक ठिकाणी नागरिक पालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे सांगत आहेत. तर काही ठिकाणी पालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्याचे नागरिक सांगत आहेत. उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत असून कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे परिसरामध्ये वारंवार धुराचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्याने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  रस्ता सुरक्षा अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन