पुणे : मॉडर्न विधी महाविद्यालयात माॅडर्न arbritration सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी न्यायाधीश श्री दिलीप कर्णिक, श्री राजेंद्र उमप चेअरमन, बार काॅन्सिल महाराष्ट्र आणि गोवा, प्रा.शामकांत देशमुख, सेक्रेटरी पी ई सोसायटी, अॅडव्होकेट डाॅ चिंतामणी घाटे, काँर्डिनेटर, विधी महाविद्यालय, डाॅ.अनन्या बिववे प्राचार्य विधी महाविद्यालय यांच्या उपस्थितीत झाले.
या महाविद्यालयामधे एल.एल.बी चे सर्व कोर्स तर आहेतच याशिवाय एल एल एम च्या १२० अँडमिशन असलेले पुण्यातील एकमेव महाविद्यालय आहे. आज हे महाविद्यालय पी एच डी चे सेंटर असुन ३८ विद्यार्थी या सेंटरमधे अशी माहिती प्राचार्य डाॅ.अनन्या बिबवे यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना श्री उमप म्हणाले,”अनेक वकील घडविण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे जे आज विविध क्षेत्रात यशस्वी काम केत आहेत. ध्येयाचा पाठपुरावा सतत केल्यास ध्येय नक्कीच गाठु शकाल आणि असेच यशस्वी व्हाल “
प्रा शामकांत देशमुख यांनी सांगितले, अशा सेंटरमुळे नविन शैक्षणिक धोरण राबविणे सोपे होईल. विद्यार्थ्यांना समाजामधे काम करण्याची संधी यामुळे मिळेल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जस्टीस कर्णिक म्हणाले, आज जवळ जवळ ५ कोटी केसेस या न्याय देण्यास पडून आहेत. या मुळे या सेंटरची गरज आहे. आज कुठलाही न्यायाधीश नेमणे हे खुप खर्चिक आहे. हे आरबीट्रेशन सेंटरमुळे बराच वेळ वाचु शकतो. न्याय जास्त आरबीट्रेशन मधे मिळतो.
साधारणतः पारंपारिक न्यायालय प्रणालीच्या बाहेरील विवादांचे निराकरण करण्यात हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते गोपनीयता, लवचिकता आणि विशेष कौशल्य ऑफर करतात, ज्यामुळे व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी आकर्षक पर्याय बनतात. याव्यतिरिक्त, ते ओव्हरलोड कोर्ट सिस्टमवरील ओझे कमी करण्यात आणि विवादांचे निराकरण करण्यासाठी एक विश्वासार्ह पर्याय प्रदान करून व्यवसाय आत्मविश्वास वाढविण्यात योगदान देतात. मध्यस्थी केंद्र केवळ वादग्रस्त पक्षांसाठी वेळ आणि पैशाची बचत करत नाहीत तर न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी वास्तविक न्यायिक कार्य कसे करावे , हा अनुभव आणि समुदायासाठी मौल्यवान शैक्षणिक संधी प्रदान करून व्यापक सामाजिक हित साधतात.लवादाच्या कार्यवाहीमध्ये आणि मध्यस्थी केंद्रांद्वारे आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान नेटवर्किंग संधी प्रदान करतो, ज्यामुळे त्यांना अनुभवी व्यवसायी आणि संभाव्य नियोक्त्यांशी संपर्क साधता येतो. या प्रदर्शनामुळे त्यांचा व्यावसायिक विकास आणि करिअरच्या शक्यता वाढू शकतात.या केंद्राचे विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतील.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा किर्तीमालीनी टिके
तर आभार प्रदर्शन प्रा अक्षय काब्रा यांनी केले. याचे समन्वय डाॅ शिवांजली भोईटे यांनी केले.कार्यक्रमाला मार्गदर्शन डाॅ अनन्या बिबवे, प्राचार्य यांनी केले.