भाजपाचे इच्छूक उमेदवार वाऱ्यावर – मुलाखती नव्हे तर थट्टा केल्याचा संताप कात्रज परिसरात अधिक नाराजी

पुणे : भाजपाने इच्छूकांचे अर्ज स्विकारून मुलाखती घेण्याचा केवळ फार्स केला,ऐनवेळी अनपेक्षितपणे नेत्यांची मुलं, नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे कळताच प्रमाणिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्याचा बोभाटा करून मोठी प्रसिद्धी मिळवली. त्याचवेळी मुलाखती पण घेण्यात आल्या. मोठ्या संखेने इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या मुलाखती वेळी आलेल्या कटू अनुभवाची चर्चा शहरभर झाली.

भारतीय जनता पार्टी हा देशातील नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे बहुसंख्येने अर्ज येणारच असे पुणे शहराचे पदाधिकारी माध्यमांसमोर वारंवार सांगून जणू इच्छूक उमेदवारांनाच सूचक इशारा देत होते. सोशल मीडियावर या मुलाखती घेण्याचे फोटो प्रसिद्ध करून शहरातही भाजपा हाच नंबर एकचा पक्ष असल्याचे वातावरण केले होते. निव्वळ बंडखोरी होईल या भितीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाही पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही.

त्याचवेळी काही संभाव्य उमेदवारांची नावे बाहेर पडत आहेत. त्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या मुलांना व नातेवाईकांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यापैकी बऱ्याच जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठीही अर्ज केलेला नाही. मुलाखतीलाही ते आले नव्हते. असे आयते आपल्या कुटुंबातले, खास मर्जीतले उमेदवार देणार असल्याची बातमी पसरली आणि सर्वसामान्य ईच्छूक उमेदवारांचा संताप शिगेला पोहचला आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आयतगब्बूंना घोड्यावर बसण्याचा प्रकार शहर पदाधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे चित्र आहे.
एकूणच शहर पदाधिकाऱ्यांनी अर्ज मागवणे व मुलाखती घेण्याचा केवळ फार्स करून पक्षाच्या निष्ठावंताची थट्टा केल्याचा संताप ईच्छुकांकडून व्यक्त होत आहे. स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या पक्षाने काँग्रेसच्याही पूढे एक पाऊल टाकल्याची उद्विग्नता पक्षाच्या ईच्छूकांकडून व्यक्त होत आहे.

प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर महर्षी नगर सॅलसबरी पार्क मधून महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात नेमका तोच प्रत्यय येतोय. पुर्वाश्रमींच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतल्यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला आहे. भाजपा शहराच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी रितसर प्रक्रियेने येणाऱ्या पुर्वाश्रमीच्या प्रामाणिक ईच्छूकांना तिकीट देण्याऐवजी त्यांना फाट्यावर मारण्याचे काम केले आहे असा थेट आरोप केला जात आहे. भाजपाचे तिकीट मिळाले की उमेदवार हमखास विजय होणार अशा समजुतीने
तडजोडी करून उमेदवार तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रामाणिक ईच्छूकांच्या समर्थकांच्या नाराजीला भाजपला समोरे जावे लागणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.

See also  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले इंद्रायणी नदी पात्राच्या स्वच्छता कामाची पाहणी

शहर भाजपाने घेतलेल्या मुलाखतीला न आलेल्यांना भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारीसाठी शहर भाजपा मधील विशेष लॉबी कडून आयते उमेदवार लादून निष्ठावंतांना डावलण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.