पुणे : पुणे महानगरपालिका आयुक्त यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या लोकप्रतिनिधींना आयुक्तांकडून दिली गेलेली अपमानास्पद वागणूक व मराठी भाषेचा अपमान याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मनसेचे प्रमुख बाबु वागसकर, साईनाथ बाबर, रणजित शिरोळे इत्यादीसंह मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आयुक्तांची तातडीने बदली करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.