दत्तनगर बाणेर परिसरात राम नदी लगत संरक्षण भिंत उभारण्याची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुनम विधाते यांची निवेदनाद्वारे मागणी

बाणेर : बाणेर येथील सर्वे नंबर 281 व  282 दत्त नगर परिसरात राम नदी लगत संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणी कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुनम विशाल विधाते यांनी केली.

बाणेर परिसरातील विधाते वस्ती जवळ दत्तनगर परिसरात शेकडो कुटुंबे राहतात. या परिसरात राम नदी लगत संरक्षण भिंत अपूर्ण असून या परिसरामध्ये मुळा नदीला पूर आल्यानंतर राम नदी पात्रातील पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने पाणी रहिवासी भागात शिरते. यामुळे नागरिकांना मोठा पाऊस झाला की सातत्याने भीतीच्या वातावरणात राहावे लागते.

राम नदी लगत दत्तनगर परिसरात संरक्षण भिंत उभारल्यास नागरिकांचा पुराचा धोका कमी होणार आहे. तसेच याच परिसरात असलेल्या नाल्याची देखील संरक्षण भिंत उभारण्याची मागणी यावेळी पूनम विशाल विधाते यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

See also  जी-२० बैठकीच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची प्रगती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवावे- अपर सचिव अभिषेक सिंग